समय निकालें भारतीय भाषाओं के लिये
कृष्णने गोवर्धन उठाया तो गोप-गोपियोंने लाठीका टेक दिया - रामने सेतू बाँधा तो गिलहरीने हाथ बँटाया। आप भी हिंदी व भारतीय भाषाओंके लिये योगदान दें। इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट सीखें। यह कक्षा पहली के पाठानुरूप (अआइई, कखगघचछजझ...) चलता है और उतनाही सरल है। फिर आप आठवीं फेल, अंग्रेजी न जाननेवाले बच्चोंको भी पाँच मिनटमें संगणक-टंकन सिखाकर उनकी दुआएँ बटोरिये।

मंगलवार, 17 सितंबर 2024

रमा गोळवलकर भारतीय प्रतिमा – विलास लेख – पिंडदान

 भारतीय प्रतिमा – विलास लेख –

२५

(c) परमभागवती रमा गोळवलकर

पिंड

भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत भारताच्या भूमीत सर्वत्र पितरांना

तर्पण देण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात पितरांची स्तुती

करणारी सूक्त आहेत. आणि पितरांना गौरवण्याचा तो सर्वात प्राचीन वाङ्मयीन

पुरावा आहे. पितरांच्या कार्य कर्तृत्वाचा सार्थ अभिमान बाळगण्याची शिकवण

देणारी ही संस्कृती. एकेकाळी संपूर्ण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर आणि

मध्य युरोप, रशियाच्या सीमेवर वसलेले देश इथे सर्वत्र राहणारे लोक सूर्य

आणि निसर्गपूजा करणारे आणि पूर्वजांना वंदन करून नंतरच कोणतंही कार्य

करणारे होते. ख्रिस्ती आणि नंतर इस्लाम विचारधारेचा उदय – प्रसार

झाल्यानंतर मात्र या सगळ्या परंपरा नामशेष झाल्यात. भारतदेशाची संस्कृती

ही अखंडित राहिली आहे म्हणूनच आजही पितृपक्ष या नावानं भाद्रपद

महिन्याचा कृष्णपक्ष ओळखल्या जातो.

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात दोन सूक्तं पितरांच्या स्तुतीकरता खर्च झाली आहेत

(ऋ. १०.१५; १०.५४). त्यात पंधराव्या सूक्तात पूर्वजांची व्याख्या करण्यात

आली आहे त्यात म्हटलं आहे मनुष्य जातीचे पूर्वज अथवा मूळपुरुष अर्थात जे

पुण्यशील मृत लोक तिसऱ्या स्वर्गांत असतात त्यांना पितर असे म्हणतात

(ऋग्वेद १०.१५,८). त्याचप्रमाणे ज्यांनी पुराणमार्गांचं अनुसरण केलं म्हणजे

पुराणांनी विस्तारानं नमूद केलेल्या जीवनशैलीचं जीवन जगले त्या साऱ्यांना

पितर म्हणतात.

अलीकडे मृत झालेले लोक ज्या मार्गांनी आपल्या पूर्वज ऋषींना भेटावयास

जातात, ते मार्ग प्रशस्त करणारे पूर्व ऋषी त्यांनाही पितर म्हणतात (ऋ.

१०.१४,२ व ७ इ.). आणखी एक संदर्भ त्यात येतो की सर्व पितर त्यांच्या

वंशजांनां म्हणजे आपल्याला माहित असणं शक्य नाही तरी अग्नीला ते सर्व


माहित असतात (ऋ. १०.१५,१ व २). श्रीविष्णूच्या उजव्या पाउलाशी या

पितरांचा संबंध आहे (ऋ. १०.१५,३).

याविषयीची एक कथा प्रसिद्ध आहे. गयासुर नावाचा असुर अतिशय विष्णुभक्त

होता. त्यानं मागितलेल्या वरदाना नुसार त्याच्या शरीराची श्रीविष्णुंसह सर्व

देवतांचा वास असलेली, आणि पितृकर्म करण्यासाठी योग्य अशी शिला झाली.

तिच्यावर आजही श्रीविष्णूंचं उजवं पाऊल कोरलेलं आहे. आणि आजही तिथे

पितृतर्पण करण्यात येतं.

अथर्ववेदात देखील पितरांचा उल्लेख येतो. जसं अंतरिक्ष, पृथ्वी व आकाश ही

पितराचं वसतीस्थान आहे (अथर्व वेद १८.२,४९).

मग अशा पितरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या सोळा दिवसांचा काळ

निश्चित केलेला आहे. आणि त्यांना पिंडदान करण्याचा प्रघात आहे. वडिलांच्या

मृत्यूनंतर वडील - आजोबा आणि पणजोबा या तीन पिढयांच्या नावाचा उल्लेख

करून त्यांच्या नावाची पिंड तयार करतात आणि श्राद्धविधीचे सोपस्कार

करतात. त्यात भाताचे गोल गोळे करून त्यांना पितर मानून त्यांना दर्भासन

देणं, गोपीचंदनाच लेपन, पांढरी फुलं, जव आणि काळे तीळ इत्यादी सामग्री

वाहणं, त्यांना भोजन देणं इत्यादी विधी करण्यात येतात. त्या मागची भावना

अशी की खापर पणजोबा मुक्त झालेत, आधीच्या बेचाळीस पिढयांत सहभागी

झालेत. आता त्यांना पितृपक्षात नाव घेऊन तर्पण करण्याची आवश्यकता नाही.

त्यांचा उल्लेख पितर या सामूहिक नामात करण्यात येईल.

याला श्राद्धकर्म म्हणतात, पूजा नव्हे. कारण देवांची करतात ती पूजा, पितरांचे

करतात ते श्राद्ध ! ज्याप्रमाणे एखाद्या देवतेची मूर्ती ठेऊन त्यावर सारे सोपस्कार

केले जातात त्याचप्रमाणे भाताचे पिंड मध्ये ठेऊन त्यावर सारे श्राद्ध कर्म

करण्यात येतात. आता या पिंडाच्या रूपात आपल्या वडील - आजोबा -

पणजोबा किंवा आई - आजी - पणजी या तीन पिढ्यांना आवाहन करून श्राद्ध

करण्याची संकल्पनाच विलक्षण आहे.

देवतापूजन करताना यज्ञोपवीत म्हणजे जानवे सव्य = डाव्या खांद्यावरून

उजवीकडे उतरलेलं तर पितरांच्या वेळी अपसव्य म्हणजे उजव्या खांद्यावरून

डावीकडे उतरलेलं असावं. देवतांना आसन म्हणून तांदळाच्या अक्षता असतात


तर पितरांना दर्भ (एक प्रकारचं वाळलेलं गवत) देण्यात येतं. देवांना अक्षता

वाहतात तर पितरांना तिलांजली. देवांना अर्घ्य देताना मधल्या बोटावरून

पाणी सोडलं जातं तर पितरांना तर्पण देताना अंगठ्यावरून. देवतांना हविर्द्रव्य

अर्पण करताना ‘स्वाहा’ म्हणतात तर पितरांना देताना ‘स्वधा’ म्हणतात.

या सगळ्यात दोन बिंदू अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला बिंदू म्हणजे पिंड ही

संकल्पना. यात पिंड या शब्दाला विविध अर्थ लगडून आहेत. त्यातला पहिला

अर्थ म्हणजे प्रतीक. शिव शंकराची पिंड म्हणतो त्यावेळी ती शिवाची मूर्ती नसते

तर शिवाचं प्रतीक असलेलं लिंग आणि योनीपीठ असा आकार असतो. मराठी

भाषेत पिंडाच्या ऐवजी पिंडी असा शब्दप्रयोग करतात सोबतच पिंड आणि

पिंडी वेगवेगळं आहे असा शब्द भ्रम निर्माण करतात. परंतु मूळ शब्द पिंड असाच

आहे.

गोलसर आकार असलेली कोणतीही वस्तू पिंड म्हणवल्या जाते. संस्कृतात

पेढ्याला किलादपिंड म्हणजे खोव्याचा गोळा म्हणतात. तर अंतरिक्षात विविध

ग्रहगोल आणि ज्योतिपिंड असतात. म्हणजे तारे आणि इतर खगोलीय पिंड.

अनेक भारतीय भाषांत बारा ज्योतिर्लिंगांना ज्योतिपिंड म्हणतात.

जवळपास सर्वच भारतीय भाषांत पिंड हा शब्द आपल्या मूळ

स्वभावासाठीदेखील वापरण्यात येतो. वानगीदाखल कोणासमोर झुकणं हा

माझा पिंड नव्हे. मोडेन पण वाकणार नाही हा माझा पिंड आहे, किंवा बाबारे

तुला हवं ते कर पण माझा पिंड सोड. इथे पिंड म्हणजे अस्तित्व म्हणून

वापरण्यात आला आहे.

पण पिंड या शब्दाचा सर्वात महत्त्वाचा संदर्भ आहे तो थेट प्रजनन प्रक्रियेशी

जोडलेला आहे. स्त्रीच्या अंडकोशातील अंड्याशी पुरुष शुक्राणूचा संयोग झाला

की ते अंड फलित होतं. त्याला इंग्रजीत झायगोट म्हणतात. हा झायगोट म्हणजे

फलित अंड द्विगुणित वेगानं वाढत जातं, म्हणजे एका पेशीचे विभाजन होऊन

दोन होतात. दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे सोळा, सोळाचे बत्तीस या

वेगानं वाढतात. आणि पाच सहा दिवसांत भ्रूण तयार होण्याआधीची अवस्था

म्हणजे एक गोलाकार पेशीपिंड तयार होतो. त्याला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात.

मायक्रोस्कोपच्या माध्यमातून पाहिलं असता हा ब्लास्टोसिस्टच्या पेशी स्पष्ट


दिसतात. त्याचं छायाचित्र पाहिल्यानंतर ज्या व्यक्तीनं श्राद्ध कर्मात तयार

करण्यात येणारे भाताचे पिंड पाहिले असतील त्यांना ब्लास्टोसिस्टची आठवण

आल्याशिवाय राहणार नाही.

ज्या प्रमाणे श्राद्धाच्या पिंडांत भाताची शितं स्वतंत्र असून एकमेकांशी जोडलेली

असतात आणि त्यांचा आकार गोल असतो त्याचप्रमाणे ब्लास्टोसिस्ट मधल्या

सर्व पेशी स्वतंत्रपणे दिसत असून एकमेकांशी जोडलेल्या असतात. आणि

त्याचाही आकार चेंडूसारखा असतो.

याचा थेट संबंध पुनर्जन्म संकल्पनेशी आहे. आणि त्यासाठी आपल्याला

श्रीमद्भवद्वगीतेचा संदर्भ घ्यावा लागेल

'वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि

विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही' ।।२,२२ ।। ज्याप्रमाणे मनुष्य जुनी

जीर्ण वस्त्रं त्यागून नवी वस्त्रं परिधान करतो त्याच प्रमाणे आत्मा आपले जुने

शरीर सोडून देत नवे शरीर धारण करतो

नेमका हाच विचार या सगळ्या श्राद्धकर्मात आणि त्यात विनियोग करण्यात

येणाऱ्या पिंडांत मांडण्यात आलेला आहे. आता मृत्यु पावलेलया व्यक्तीनं आपले

हे जीर्ण शरीर सोडून दिलं असून ती नवा देह धारण करण्याच्या प्रक्रियेत गुंतली

आहे. त्यामुळे सुज्ञ अर्थातच ज्ञानी लोकांनी त्याच्या मृत्यूविषयी विनाकारण शोक

करू नये. हेच सूचित करणारे हे भाताचे पिंड असतात. जन्म आणि मरण या दोन

एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जन्म झालेला प्रत्येक जीव हा मृत्युमुखी

पडणार आहेच तसंच मृत्यू पावलेला प्रत्येक जीव, मोक्ष प्राप्त केलेले काही

सन्माननीय अपवाद वगळता, पुन्हा जन्म घेतच असतो. आणि फलित अंड्याची

भ्रूणरूप धारण करण्याआधीची अवस्था अर्थात ब्लास्टोसिस्टची अवस्था जशी

असते तसेच हे पितृरूपी पिंड आहेत, हेच सांगण्याचा या सगळ्यातून होताना

दिसतो.

या सगळ्या प्रक्रियेला श्रीआदि शंकराचार्य अतिशय समर्पक शब्दांत मांडतात -

पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्। इह संसारे बहुदुस्तारे,

कृपयाऽपारे पाहि मुरारे भजगोविन्दं भजगोविन्दं, गोविन्दं भजमूढमते।

नामस्मरणादन्यमुपायं, नहि पश्यामो भवतरणे ॥ वारंवार जन्म आणि पुनःपुन्हा


मृत्यू आणि पुन्हा एकदा आईच्या जठरात = गर्भाशयात झोपणं, या संसार

सागराच्या पलीकडे जाणं खरोखरच महाकठीण काम आहे, तरी हे कृष्णा कृपा

करा। गोविंद गोविंद हे नामस्मरण केल्याशिवाय अन्य पर्याय नाही.

म्हणूनच शारदीय नवरात्रासाठी पृथ्वीवर येण्यासाठी निघालेली विजयादुर्गा

याच सोळा दिवसांचा प्रवास करते आणि सृजनाच्या उत्सवासाठी अवतरते अशी

मान्यता आहे. त्यामुळे या दिवसांना महालय असं ही संबोधन वापरतात. हा

सगळा खटाटोप पुनर्जन्माचा सिद्धांत मनावर ठसवण्यासाठी करण्यात आला

आहे. साध्या भाताच्या गोळ्यातून एवढी व्यापक संकल्पना प्रतुत करणारा हा

आपला भारतीय प्रतिमा विलास !!


(c) परमभागवती रमा गोळवलकर

कोई टिप्पणी नहीं: